कल्याणमध्ये इमारत ताशाच्या पत्त्यांसारखी कोसळली ,अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ समोर, आजूबाजूच्या इमारतींमध्ये धुळीचे साम्राज्य, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही ।

  • कल्याणमध्ये इमारत ताशाच्या पत्त्यांसारखी कोसळली ,अंगावर शहारा आणणारा व्हिडिओ समोर, आजूबाजूच्या इमारतींमध्ये धुळीचे साम्राज्य, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही ।

कल्याण : कल्याण पश्चिमेतील घोलपनगर परिसरात रविवारी दुपारी एक भीतीदायक घटना घडली. पुनर्विकासासाठी पाडली जात असलेल्या ‘विनायक दर्शन’ नावाच्या इमारतीचा मोठा भाग अचानक कोसळला. कल्याण योगीधाम जवळील घोलपनगर भागात इमारत निष्कासित करतांना कोसळली ,परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले होते पुनर्र विकास(Redevlopment) साठी खाली केलेली इमारत तोडण्याचे काम चालू असल्याची माहिती समोर आली आहेत्यात एल. टी. लाईन (LT line) चे खांब कोसळले परिसरातला विद्युत प्रवाह खंडित झालं होता. दरम्यान इमारत कोसळताच परिसरात एकच गोंधळ उडाला. आजूबाजूला राहणारे रहिवासी घाबरून घराबाहेर पळाले. इमारत कोसळतानाचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. माहितीनुसार, घोलपनगरमधील ही इमारत बरीच जुनी आणि धोकादायक झाली होती. गेल्या काही दिवसांपासून तिच्याबाबत तक्रारी केल्या जात होत्या. त्यानंतर ही इमारत पुनर्विकासासाठी एका बिल्डरला देण्यात आली होती. पाऊस कमी झाल्यानंतर बिल्डर आणि कंत्राटदाराने पाडकामाला सुरुवात केली. मात्र स्थानिकांचा आरोप आहे की इमारत पाडताना कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा काळजी घेण्यात आली नाही. याच निष्काळजीपणामुळे इमारतीचा भाग अचानक ढासळला. या प्रकरणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही इमारत पुनर्विकासासाठी ताब्यात घेण्यात आली होती. प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.घटना घडली तेव्हा आजूबाजूला फारशी गर्दी नसल्याने मोठा अनर्थ टळला. सध्या पोलीस आणि केडीएमसीची पथके घटनास्थळी पोहोचून पुढील तपास करत आहेत ।