आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांची शहरातील नालासफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी !

  • आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांची शहरातील नालासफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी !

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिका हद्दीतील आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या मोठ्या व लहान नाल्यांच्या स्वच्छता व गाळ काढण्याच्या कामांची मा. आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी प्रत्यक्ष स्थळभेट देऊन सखोल पाहणी केली. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी श्री. मनीष हिवरे (APHO) तसेच श्री. एकनाथ पवार (मुख्य स्वच्छता निरीक्षक) उपस्थित होते. मा. आयुक्तांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या नालासफाईच्या कामांचा आढावा घेत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाची गुणवत्ता, गती आणि सुरक्षितता याबाबत आवश्यक सूचना दिल्या. खन्ना कंपाऊंड ब्रिज परिसर वालधुनी नदी, भरत नगर, कानसाई रोड, उल्हासनगर-5 चंद्रमणी बुद्ध विहार नाला, उल्हासनगर-4 जिजामाता कॉलनी येथील मोठा नाला (पॅनल क्र. 17), उल्हासनगर-4 शहरातील विविध मोठे व लहान नाले  आयुक्त श्रीमती मनीषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांनी नाल्यांमधील गाळ संपूर्णपणे काढणे, काढलेला गाळ तात्काळ उचलून त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे, नाल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा अथवा अडथळा राहणार नाही याची दक्षता घेणे तसेच पावसाळ्यापूर्वी सर्व नालासफाईची कामे निर्धारित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच, पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचणे, पूरस्थिती किंवा इतर गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून नालासफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. उल्हासनगर महानगरपालिका शहरातील सर्व प्रमुख नाले, नदीपात्रे व पाणी वाहून नेणाऱ्या मार्गांची नियमित पाहणी करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत सूचना दिलेल्या असून, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिलेले आहे ।