- डोंबिवली शहर वासियांसाठी मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर ।
डोंबिवली : शिवसेना तर्फे कल्याण ग्रामीण विभाग आणि डोंबिवली शहर वासियांसाठी मोफत शासकीय दाखले वाटप शिबिर घेण्यात आले. या मोफत शिबिराचा फायदा शहर आणि ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. शासन आपल्यादारी या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आल्याचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितले. पूर्वेकडील पाटीलदार हॉल, व्यंकटेश पेट्रोल पंपाच्या मागे, डोंबिवली (पूर्व) येथे रविवार दिनांक २८ जून २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत सदर शिबिर घेण्यात आले. या शिबिरात उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल- रहिवासी दाखला, जेष्ठ नागरिक दाखला आदी दाखले गरजूंना देण्यात आले. कल्याण ग्रामीणचे आमदार तथा शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. दरम्यान आमदार राजेश मोरे म्हणाले, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा क्षेत्रामध्ये शासन आपल्या दारी या अनुषंगाने शिवसेना पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दाखले वाटपाचे शिबिर येथे होत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्साह आहे. अनेक लोकांना दाखले कसे मिळतील यासाठी काम केलेले आहे. लोकांना शासनाच्या दारात जायला नको म्हणून शासनालाच लोकांसमोर आणून लोकांचा त्रास वाचविण्याचा हा प्रयत्न आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी आमदार राजेश मोरे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, संतोष चव्हाण, सतीश मोडक, प्रकाश म्हात्रे, दत्ता वझे, सागर जेधे आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते… चौकट : याशिवाय प्रतिवर्षाप्रमाणे शिवसेना आमदार राजेश मोरे आणि प्रभाग क्रमांक २१ अंतर्गत नगरसेवक हर्षल राजेश मोरे, सूरज राजन मराठे, दिप्ती पाटील, ज्योती मराठे यांच्या प्रयत्नाने प्रभागातील नागरिकांना पावसापासून संरक्षण म्हणून छत्री वाटप तसेच विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम झाला. मुलांना छान मोफत वह्या व नागरिकांना मोफत छत्र्या मिळाल्याने लोकांनी आनंद व्यक्त केला ।
