- दावत-ए-इफ्तार, टोरेंट पॉवर द्वारे भिवंडीमध्ये आयोजित सामुदायिक बंधन आणि एकता साजरी करण्याचा वार्षिक कार्यक्रम ।

भिवंडी : या वर्षी देखील टोरेंट पॉवरने एकता आणि सामुदायिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने भव्य इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. रमजान महिना सुरू आहे, मंगळवार, ११ मार्च २०२६ रोजी भिवंडीतील नागरिकांसाठी टोरंट पॉवरतर्फे पाटीदार हॉल – अशोक नगर येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास शहरातील सुमारे 400 मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली. यावेळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी, महानगरपालिकेचे अधिकारी, प्रसिद्ध राजकीय लोक, विविध मीडिया / पत्रकार मंडळी, आणि क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित होते. यावेळी टोरेंट तर्फे, जीवन क्लर्क-उपाध्यक्ष व जय पांड्या, सुधीर देशमुख, चेतन बदियानी यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह टोरेंटच्या टीमने सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. सय्यद मुफ्ती मोहम्मद उझैफा कासमी यांनी उपस्थित पाहुण्यांना रमजान आणि इफ्तारचे महत्त्व समजावून सांगितले. पाहुण्यांनी टोरेंट पॉवरच्या व्यवस्थेचे कौतुक केले आणि सांगितले की अशा कार्यक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये सहकार्य, शांतता आणि एकोपा निर्माण होण्यास मदत होते. टोरेंट पॉवरचे पीआरओ चेतन बदियानी यांनी बातमीदारांना कंपनीचा लोगो बदलल्याची माहिती दिली व सांगितले की, अशा कार्यक्रमांमुळे कंपनी आणि सामाजिक समुदाय यांच्यातील नाते अधिक घट्ट होते ।
