महासभेत गोंधळ; होर्डिंग आणि पदोन्नतीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने

  • महासभेत गोंधळ; होर्डिंग आणि पदोन्नतीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
  • तीव्र शाब्दिक चकमकीनंतर काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांचे सभात्याग 
कल्याण :  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या गुरुवारी पार पडलेल्या सर्वसाधारण महासभेत अनधिकृत होर्डिंग्ज आणि अग्निशमन विभागातील पदोन्नतीच्या मुद्द्यावरून जोरदार गदारोळ झाला. आरोप-प्रत्यारोप आणि तीव्र वादावादीनंतर सभागृहाचे वातावरण तापले, अखेर काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी सभेवर बहिष्कार टाकत सभात्याग केला.शिवसेना भाजप बहुमताने सत्तेत आल्याने काही प्रमाणात माजुर्टेपनां वाढलं आहे त्यामुळे कुमक विरोधी पक्ष नगरसेवकांना दबावाचे राजकारण सुरू केले आहे । महासभेत नगरसेवकांनी अग्निशमन विभागातील पदोन्नती प्रक्रियेबाबत प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले आणि ही प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी केली. त्याचबरोबर शहरातील अनधिकृत होर्डिंग्जचा मुद्दाही सभागृहात चांगलाच गाजला.
वादाला कशी झाली सुरुवात?
शिवसेना (शिंदे गट) चे नगरसेवक गणेश जाधव यांना प्रश्न मांडण्याची संधी न मिळाल्याने गोंधळाला सुरुवात झाली. यावर काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी आक्षेप घेतला. याच मुद्द्यावरून शिवसेना (शिंदे गट) नगरसेविका दर्शना काळे आणि कुलकर्णी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. वाद वाढत असताना कुलकर्णी यांनी भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांच्यावर आरोप केले. यावर म्हात्रे यांनी प्रतिउत्तर देताना शिवसेना (शिंदे गट) चे गटनेते विश्वनाथ राणे हेच कुलकर्णी यांना चिथावणी देत असल्याचा आरोप केला. त्यानंतर म्हात्रे आणि राणे यांच्यातही तीव्र बाचाबाची झाली. महापौर हर्षाली चौधरी यांनी वारंवार शांततेचे आवाहन करूनही गदारोळ शमला नाही. अखेर संतप्त झालेल्या कुलकर्णी यांनी “कधी बोलायचे आणि कधी गप्प बसायचे हे कोणी दुसऱ्याने ठरवायचे नाही,” असे म्हणत सभागृहाबाहेर पाऊल टाकले. या गोंधळामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमधील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.