कल्याणकरांची रोजची ‘तारेवरची कसरत’! स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक… चालायचं तरी कुठून ?

  • कल्याणकरांची रोजची ‘तारेवरची कसरत’! स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक… चालायचं तरी कुठून ?

कल्याण : कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मोहम्मद अली, कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात फूटपाथ दुकान दारानी लोखंडी जाळ्या अडथळा, कोणी कार्पेट टाकले आहे ,फुटपाथवर दुकानदारांचे पुतळे, लगत दुचाकी पार्किंग, त्यानंतर फेरीवाल्यांचा विळखा; रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे पादचाऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत । अशोक फूट वेअर दुकान मालकाने चक्क फूटपाथवर कार्पेट पसरले आहे बिनदकतपणे काही व्यापाऱ्यांनी लोखंडी जाळ्या दुकानासमोर मांडले आहेत त्यामुळे वाहनांना अडथळा वाटसरूंना ग्राहकांना चालताना तारेवरचे कसरत करावी लागते त्यामुळे नागरिकांची दमछाक होते प्रवासी मुकटपणे सहन करत आहे कारण सर्व अधिकारी कर्मचारी एस आय आर मध्ये गुंतल्याने फिरवाल्यांचे फावले आहे . परिणामी कोणी च रोखण्यासाठी नसल्याने आपले बसस्थान जागा देते दिसेल तिथे मांडत आहेत कल्याण रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौकपर्यंतचा प्रत्यक्ष प्रवास… नागरिकांना रोज कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, हा परिसर क” प्रभाग कार्यालय हद्दीमध्ये येतो. अ अतिक्रमण विभागात ला दोन पथक प्रमुख दिले असताना सुद्धा फेरीवाल्याचा प्रश्न ऐरणीवर आहे त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे ।