केडीएमसीच्या मोहने मध्ये मुद्दत गेलेल्या औषधांचा ढीग मेडिकल ।

  • केडीएमसीच्या मोहने मध्ये मुद्दत गेलेल्या औषधांचा ढीग मेडिकल ।

कल्याण : कल्याण जवळील आंबिवली मधील मोहने परिसरातील यादव नगर स्मशानभूमीजवळ उल्हास नदीकाठी तारीख संपलेल्या औषधांचा ढीग आढळून आला आहे त्यामुळे नदी किनाऱ्याच्या आणि परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोहने मधील यादव नगर मिनी डम्पिंग ग्राउंड होतो की काय अशी भीती नागरिकांना आणि ग्रामस्थांना भेडसावत आहे . अ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत असणाऱ्या आंबिवली मधील मोहने परिसरात यादव नगर स्मशान भूमी बाजूला मोठ्या प्रमाणात मेडिकल वेस्टची उघड्यावर विल्हेवाट लावण्या ऐवजी रस्त्याच्या बाजूला मेडिकल्स कचरा टाकण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त जयवंत चौधरी यांच्या निदर्शनास आणून दिले होते मात्र एस आय आर कामात अधिकारी आणि कर्मचारी वर्ग कामात गुंतल्याने काही प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याची कबुली दिली आहे। दरम्यानकल्याणमध्ये मेडिकल वेस्टचा गंभीर प्रश्न! पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही अशी भीती नागरिकाना, ग्रामस्थांना भेडसावत आहे । घनकचरा विभागाने करोडो रुपये मेडिकल वेस्ट विल्हेवाट लावण्यासाठी केला जातो या बाबीकडे लक्ष देईल अशी आशा नागरिक व्यक्त करत आहे ।