- डोंबिवली मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार ,दोन आरोपी गजाआड ।
डोंबिवली : डोंबिवलीत १६ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार; काम आणि निवाऱ्याचे आमिष दाखवत तिघांचा संतापजनक प्रकार उंबरली परिसर घडला आहे यात आरोपींना गजाआड केले आहे। डोंबिवलीच्या उंबरली परिसरात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने महिलांचे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी अटकेत आहे.दरम्यान नराधम आरोपी अंगुर ठाकूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नाव असून इतर दोन आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती पोलीस सहाय्यक आयुक्त. सुहास हेमाडे यांनी दिली ।
