- एसटी महामंडळाच्या अधिकृत नोंदणी केंद्राद्वारे 65 वर्षांवरील पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड शिबिरासाठी शिवसेनेचा पुढाकार ।
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे यांच्या प्रयत्नातून डोंबिवली एमआयडीसी येथील एसटी डेपोमध्ये एसटी महामंडळाच्या अधिकृत नोंदणी केंद्रामार्फत 65 वर्षांवरील पुरुष ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार दि. 30 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता या शिबिराचा शुभारंभ कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला असून, पहिल्याच दिवशी सुमारे 100 ज्येष्ठ पुरुष नागरिकांनी शासनाने निश्चित केलेले ₹199 शुल्क भरून NCMC स्मार्ट कार्डचा लाभ घेतला. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार 65 वर्षे पूर्ण झालेल्या पुरुष ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या बस प्रवासात 50 टक्के भाडे सवलत मिळण्यासाठी हे स्मार्ट कार्ड आवश्यक आहे. याशिवाय, राज्यातील सर्व महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत तसेच 75 वर्षांवरील महिला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत 100 टक्के मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. हे विशेष नोंदणी शिबिर 30 जुलै ते 1 ऑगस्ट 2026 या कालावधीत दररोज सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 या वेळेत एसटी डेपो, जिमखाना रोड, एमआयडीसी, डोंबिवली पूर्व येथे सुरू राहणार आहे. तसेच 3 ऑगस्ट 2026 पासून डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेत दररोज दुपारी 3.00 ते सायंकाळी 7.00 या वेळेत NCMC स्मार्ट कार्ड देण्याची सशुल्क सेवा नियमितपणे उपलब्ध राहणार आहे. स्मार्ट कार्ड काढण्यासाठी संबंधित ज्येष्ठ नागरिकांनी आधार कार्ड, ओटीपी प्राप्त होण्यासाठी स्वतःचा मोबाईल फोन सोबत आणणे आवश्यक असून, ज्यांचे कार्ड काढायचे आहे त्या व्यक्तीची प्रत्यक्ष स्वतःच्या दोन रंगीत पासपोर्ट साईज फोटोसह उपस्थिती अनिवार्य आहे. स्मार्ट कार्डासाठी शासनाने निश्चित केलेले ₹199 शुल्क आकारले जाईल. हरवलेले किंवा खराब झालेले स्मार्ट कार्डही नियमानुसार शुल्क भरून बदलून मिळणार आहे. डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शहर शाखेच्या वतीने 65 वर्षांवरील सर्व पात्र पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवास अधिक सुलभ आणि किफायतशीर करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही यावेळी आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे यांच्या वतीने सांगण्यात आले. 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांना एसटी विषयक प्रवास दरात 50 टक्के सवलत मिळवून देणारे स्मार्ट कार्ड मिळवून देण्याच्या या शुभारंभ कार्यक्रमात आमदार श्री राजेश मोरे यांचे सोबत शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम साहेब, संतोष चव्हाण विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा सचिव, सुनील भोसले उपशहर प्रमुख, तेजस पाटील विभाग प्रमुख, धर्मराज शिंदे कार्यालय प्रमुख कल्याण ग्रामीण, शैलेश चव्हाण सहकार्यालय प्रमुख, राज्य परिवहन विभागाच्या वतीने विभाग नियंत्रक कैलास पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी धनंजय शिंदे, आगार व्यवस्थापक चेतन देवधर, शिवसेनेचे उपशहर संघटक संतोष तळाशीलकर, शिवसेना शासकीय योजना विषयक जिल्हा समन्वयक श्री शैलेश देशमुख, खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांचे जनसंपर्क कार्यालय प्रतिनिधी तथा माजी नगरसेवक श्री प्रकाश शांताराम माने तसेच एसटी महामंडळाचे कर्मचारी वर्ग, प्रवासी / नागरिक, शिवसेनेचे अनेक महिला पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते ।
