- ‘कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वार्षिक मिनी मॅरेथॉन २०२६’ चा उत्साहपूर्ण शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला ।
डोंबिवली : डोंबिवली पूर्व येथील शिवाई बालक मंदिर आयोजित ‘कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वार्षिक मिनी मॅरेथॉन २०२६’ चा उत्साहपूर्ण शुभारंभ भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडला. या मॅरेथॉनमध्ये कल्याण-डोंबिवली परिसरातील शेकडो विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, शिस्त आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम ला शिक्षण समितीचे सभापती अभिजीत थरवळ, नगरसेवक महेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, पालक, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले ।
