अल्पसंख्याक आघाडी ख्रिश्चन समाज अध्यक्षपदी पॉली जेकब यांची नियुक्ती ।

  • अल्पसंख्याक आघाडी ख्रिश्चन समाज अध्यक्षपदी पॉली जेकब यांची नियुक्ती ।

डोंबिवली : शिवसेना कल्याण लोकसभा अल्पसंख्याक आघाडी ख्रिश्चन समाज अध्यक्ष पदी पॉली जेकब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत राज्याध्यक्ष जेरी डेव्हिड यांच्या हस्ते पॉली जेकब यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष रिचर्ड जोसेफ व सनी अँथनी हे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी पार पाडणार असल्याचे पॉली जेकब यांनी सांगितले. ख्रिश्चन समाजाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी, शिवसेनेची विचारधारा अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रामाणिकपणे आणि समर्पित भावनेने सातत्याने कार्य करण्याचा संकल्प जेकब यांनी केला आहे ।