लोढा स्किल अॅण्ड एम्प्लॉयमेंट अकादमी’चे उद्घाटन कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले ।

  • ‘लोढा स्किल अॅण्ड एम्प्लॉयमेंट अकादमी’चे उद्घाटन कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले ।

डोंबिवली : डोंबिवलीतील पलावा येथे ‘लोढा फाऊंडेशन’ आणि ‘आगरी यूथ फोरम’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी अध्ययन केंद्रा’अंतर्गत ‘लोढा स्किल अॅण्ड एम्प्लॉयमेंट अकादमी’चे उद्घाटन कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. रोजगार आणि शिक्षणाच्या वाढत्या आव्हानांवर ही अकादमी प्रभावी उपाय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री लोढा यांनी सांगितले की, या अकादमीत विद्यार्थ्यांसाठी विविध कौशल्याधारित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात येणार असून, स्वयंरोजगार आणि नोकरीच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. अकादमीपर्यंत विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यासाठी बसचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी आतापर्यंत ६०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, पहिल्या बॅचमध्ये २४० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, हभप चेतन महाराज, आचार्य प्रल्हाद शास्त्री महाराज, ‘आगरी यूथ फोरम’चे अध्यक्ष गुलाब वझे, शरद पाटील आणि ‘लोढा फाऊंडेशन’चे संचालक दिगंबर दळवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच ‘हरित महाराष्ट्र’ उपक्रमांतर्गत पाच हजार झाडे उपलब्ध करून देण्याची घोषणाही मंत्री लोढा यांनी केली ।