जेष्ठ शिवसैनिक नरेंद्र म्हात्रे यांसह अनेक शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश ।

  • जेष्ठ शिवसैनिक नरेंद्र म्हात्रे यांसह अनेक शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश ।

डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशनजवळील भाजपा कार्यालयाच्या उदघाटनप्रसंगी प्रदेशअध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत जेष्ठ शिवसैनिक नरेंद्र म्हात्रे, प्रियेश म्हात्रे, दुर्वेश म्हात्रे यांसह अनेक शिवसैनिकांचा भाजपात प्रवेश केला. नरेंद्र म्हात्रे यांना राजकारणाचा गाढा अभ्यास असून विकास कामांकडे पाहून आपण भाजपात प्रवेश केल्याचे म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नगरसेवक दीपेश म्हात्रे आदीसह इतर नगरसेवक व अनेक पदाधिकारी उपस्थित होते ।