बल्याणी परिसरात २८० बेकायदेशीर रूम कारवाई, केडीएमसी अतिरिक्त आयुक्त घटनास्थळी हजर ।

  • बल्याणी परिसरात २८० बेकायदेशीर रूम कारवाई, केडीएमसी अतिरिक्त आयुक्त घटनास्थळी हजर ।

कल्याण : टिटवाळा, मोहने, आंबिवली, बल्याणी भागात आर आरक्षित , वनविभाग , आणि खाजगी भूखंडावर , मोठ्या प्रमाणात चाल माफिया , आणि बेकायदेशीर बांधकाम करणारे उद्योजक यांचे चाळीचे साम्राज्य पसरवले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशाने दिनांक. २२/०५/२०२६ रोजी निर्देशानुसार तसेच मा. अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे व मा. उप आयुक्त (अ.बां.नि.) प्रसाद बोरकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली १/अ प्रभागक्षेत्रातील खजुरी नगर, क्रिकेट ग्राऊड बल्याणी येथिल २८० रूमचे बांधकाम व ६० जोत्यांचे बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे. सदर कारवाई दरम्यान मा. अतिरिक्त आयुक्त श्री. योगेश गोडसे साहेब व मा. उप आयुक्त (अ.बां.नि.) प्रसाद बोरकर साहेब, सहा. आयुक्त सुषमा मांडगे, ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी धनंजय थोरात, ‘ड’ प्रभागक्षेत्र अधिकारी . उमेश यमगर, ‘फ’ प्रभागक्षेत्र अधिकारी प्रसाद ठाकुर, ‘ग’ प्रभागक्षेत्र अधिकारी जयराम शिंदे व त्यांच्या कडील अतिक्रमण विभागातील पथक, अबांनि मुख्यालयातील पोलीस स्टाफ व अधिकारी, टिटवाळा पोलिस स्टेशन येथिल ७ अधिकारी व ७८ पोलिस अंमलदार तसेच ठेकेदाराकडील मनुष्यबळ, १ पोखलन व ४ जेसीबी, अग्निशमन पथक आणि रूग्णवाहीका पथक यांच्या सहाय्याने सदर निष्कासन कारवाई करण्यात आली आहे. अ “प्रभाग क्षेत्र अधिकारी जयवंत चौधरी यांनी माहिती दिली आहे आणि भविष्यात होणाऱ्या बेकायदेशीर बांधकामांवर लक्ष ठेवण्यात येईल अशी माहिती देण्यात आली ।