- आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सीबीडी सेक्टर – 8 बी येथील अष्टविनायक सोसायटी जवळील उद्यानाचा सुशोभीकरण व इतर अनुषंगिक कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न ।
नवी मुंबई : नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे. तसेच आमदार मंदाताई म्हात्रे यांचा बेलापूर विधानसभा क्षेत्रामध्ये विकास कामांच्या भूमिपूजनाचा धडाका सुरूच आहे. त्याच बरोबर आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून व आमदार निधीमधून नवी मुंबई शहरामध्ये “विकास कामांची गंगा” वाहत असून आज बेलापूर मतदार संघातील सीबीडी येथील सेक्टर 8 बी अष्टविनायक सोसायटी जवळील उद्यानाचा सुशोभीकरण व इतर अनुषंगिक कामांचा भूमिपूजन मोठ्या उस्ताहात संपन्न झाला. तसेच भाजपा नेते तथा नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी सांगितले की, सीबीडी येथील सेक्टर – 8 बी येथील नागरिकांना व लहान मुलांना फेरफटका मारण्यासाठी व खेळण्याकरिता विकसित असा उद्यान नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सीबीडी सेक्टर – 8 बी येथील अष्टविनायक सोसायटी जवळील उद्यानाचा विकास व सौंदर्यकीकरण करण्यात येणार असून त्यामध्ये अत्याधुनिक सोलर बँचेस, गजेबो, LED ग्लोबल टनल, डान्सिंग फ्लोअर लाईट, अत्याधुनिक प्रवेशद्वार, प्रस्तरारोहन भिंत, FRP भिंत, सेल्फी पाँइट, गोबो आणि वेब प्रकारातील थीम उभारणे अशा विविध प्रकरच्या लायटिंग शो उभारण्यात येणार असून नवी मुंबईतील एकमेव असा उद्यान निर्माण होणार आहे. त्यामुळे येथील सीबीडी वासियांना सुंदर असा एक मॅजिक गार्डन पाहवयास मिळणार आहे. त्यामुळे सीबीडी सेक्टर – 8 बी येथील अष्टविनायक सोसायटी जवळील उद्यानाचा कायापालट होणार असून सीबीडी वासियांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आमदार मंदाताई म्हात्रे यांचे कौतुक होत आहे. यावेळी भाजपा नेते तथा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे यांच्या समवेत नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, नगरसेविका सुरेखा नरबागे, भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता गोपालराव गायकवाड, बलबीरसिंग चौधरी, समाजसेवक अशोक नरबागे, बेलापूर मंडळ अध्यक्ष अजय सिंग, दर्शन भारदवाज, संजय ओबेरॉय, हस्तीमल जैन, राजू कोळी, भूषण ठाकूर, निलेश पाटील, अजय पासवान, जयराम पासवान, नितीन सोनावणे, किसन राठोड, एजाज खान, अल्ताफ धुरु, मनोज भगत, किशोर पाटील, निळकंठ कोळी, किरण वर्मा, आरती राउळ, देवयानी मुकादम, माधुरी सावंत, रेखा गोदाम, मीना ओझा तसेच सीबीडीतील असंख्य नागरिक उपस्थित होते ।
