- धडक कारवाई – मोटरसायकल चोरी करणाऱ्या ४ आरोपींना बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या ।
कल्याण : कल्याण परिमंडळ ३ अंतर्गत बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे राबवलेल्या धडकन कारवाईत मोटरसायकल चोरी करणाऱ्या ४ आरोपींना शिताफीने जेरबंद करण्यात यश मिळवले असून ६ मोटार सायकल,स्कूटी ताब्यात घेतल्या आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी हे १८ ते २२ वयोगटातील तरुण असून, केवळ मोटरसायकल चालवण्याच्या मौजेसाठी त्यांनी चोरी केल्याची धक्कादायक कबूल दिली आहे. या टोळीमुळे अनेक ठिकाणी दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या, ही संपूर्ण कारवाई ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत बाजारपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंग गोंड , गुन्हे पोलीस निरीक्षक डूकळे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत आंधळे, यांच्यासह पोलीस हवालदार पाटील, भालेराव, बागुल, बाविस्कर, आंधळे, ईशा यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता असून, नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे ।
