- शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत प्रवेश वाटप पत्र वितरण सोहळा उत्साहात संपन्न!
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने RTE अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश वाटप पत्रांचा म्हणजेच (Allotment Letter) चा वितरण समारंभ पार पडला. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, उपस्थित राहून चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाच्या नव्या टप्प्यासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या व त्यांच्या पालकांचेही अभिनंदन केले. या सोहळ्याला शिक्षण समिती सभापती अभिजीत थरवळ, शिक्षण समिती सदस्य शामलजी गायकर, जतीनजी प्रजापती , प्रतीक पेणकर,श्रीमती अनघा देवळेकर ,सौ.रसिका पाटील,सौ शालिनी वायले ,सौ अपर्णा भोईर तसेच शिक्षण अधिकारी सरकते व प्रशासन अधिकारी बोरनारे व मुख्याध्यापक उपस्थित होते ।
