- थोर समाज सुधारक “महात्मा ज्योतिबा फुले” यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन !
डोंबिवली : “महात्मा ज्योतिबा फुले” यांच्या जयंतीदिनी आज महापालिका मुख्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापालिका महापौर हर्षाली चौधरी व महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महापालिका सचिव किशोर शेळके, उपायुक्त प्रसाद बोरकर, सहा.जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत व इतर अधिकारी/कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. तदनंतर कल्याण मधील महात्मा फुले चौक येथील “महात्मा ज्योतिबा फुले” यांच्या पुतळयासही महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. डोंबिवली (पश्चिम) रेल्वे स्थानका जवळील “महात्मा ज्योतिबा फुले” यांच्या पुतळयास महापालिका उप महापौर राहुल दामले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महापालिका उपायुक्त वंदना गुळवे, पालिका सदस्य नंदू म्हात्रे, समीर चिटणीस, मृदुला नाख्ये, 7/ह प्रभागाचे सहा.आयुक्त राजेश सावंत व इतर इतर अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते ।
