कल्याण, ठाणे आणि मुरबाड परिसरातील एकूण 8 चोरीचे गुन्हे उघड ।

  • कल्याण, ठाणे आणि मुरबाड परिसरातील एकूण 8 चोरीचे गुन्हे उघड ।

कल्याण : खडकपाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका सराईत दुचाकी चोराला जेरबंद करून त्याच्याकडून 9 दुचाकी असा एकूण 6,35,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामुळे कल्याण, ठाणे आणि मुरबाड परिसरातील एकूण 8 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. दि. 04/08/2026 रोजी महानगरपालिका डंपिंगजवळ, 10 फूट वडवली रोड, गांधारी, कल्याण पश्चिम येथून हॉन्डा सीबी शाईन MH05BX1296 ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. 399/2026 भा.न्या.सं. कलम 303(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्यापासून 24 तासांच्या आत आरोपी अब्बास शाहजोर सय्यद, वय 25 वर्षे, रा. खोली नं. 102, मलंगनगर, अटाळी रोड, आंबिवली, कल्याण पश्चिम याला पेट्रोलिंग दरम्यान ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीची हॉन्डा सीबी शाईन हस्तगत करून अटक करण्यात आली. त्याला 07/08/2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याच्याकडून विविध पोलीस ठाण्यातून चोरलेल्या 9 दुचाकी मिळून आल्या. यामध्ये स्कुटी आणि अपाचे सारख्या महागड्या दुचाकींचा समावेश आहे ।