घरफोडी चोरी चा गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक ।

  • घरफोडी चोरी चा गुन्हा उघडकीस आणुन आरोपी अटक ।

कल्याण : कोळसेवाडी पोलीस ठाणे हददीत रूम नं.०४, सुलभ शौचालयाजवळ नेतीवली, कल्याण पुर्व येथे संजय भगवान कांबळे, वय ४५ वर्षे,रूम नं.०४, आनंद नगर, नेतीवली, कल्याण पुर्व यांचे राहते घरातुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने राहते दरवाजाचे कुलुप तोडुन त्यावाटे घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे व चांदिचे दागिणे, गॅस सिलेंडर, मोबाईल फोन, फॅन, रोख रक्कम व इतर साहित्य घरफोडी चोरी करून नेले बाबात फिर्यादी यांचे दिले तकारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाणे रा.गु.र.नं.४१८/२०२६ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३३१(३),३३१ (४),३०५ प्रमाणे दिनांक २३/०७/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर दाखल गुन्हयाचा तपास मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप भालेराव व त्यांचे पथक असे करीत असताना तांत्रीक विश्लेषण व पो.हवा ५०३ वाघ यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे आधारे आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे १) नदीम लियाकत खान, वय ३९ वर्षे, रा.भुई डोंगरी, आनंदनगर, नेतीवली, कल्याण पुर्व २) राम प्रकाश गायकवाड, वय ३६ वर्षे, दोन्ही रा. भुई डोंगरी, आनंदनगर, नेतीवली, कल्याण पुर्व यांना सदर गुन्हयात अटक करून गुन्हयातील चोरीस गेलेले ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व चांदिचे दागिणे, मोबाईल फोन, ५०००/- रोख रक्कम व इतर मुदद्देमाल असा एकुण ४,५०,०००/- रू. किमंतीचा मुदद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण संजय जाधव सो, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ ३. कल्याण अतुल झेंडे सो, व सहा. पोलीस आयुक्त कल्याण विभाग अशोक होनमाने सो यांचे मार्गदर्शनाखाली कोळसेवाडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पगार व पोनि (गुन्हे) विजय खेडकर, यांचे सुचनेप्रमाणे सहा. पो निरी संदिप भालेराव, पोहवा ५०३ विशाल वाघ, पोहवा ६९३० गोरखनाथ घुगे, पोहवा २१५ जाधव, पोहवा २२८३ सचिन आव्हाड, पोहवा ४२० बुधवंत, पोशि १५२६ इंगळे, पोशि ३६०१ खरे, पोना ४५७ दिलीप कोती यांचे पथकाने केलेली आहे ।