- गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर २४६ गणपती विशेष गाड्या सोडण्यात येणार; १ आँगस्टपासून तिकीट बुकिंग करता येणार ।
ठाणे : गणेशोसत्सवासाठी आता अवघा एक महिना उरला आहे. पण चाकरमानी आधीपासूनच गणपतीच्या तयारीला लागला आहे. कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी नियमित गाड्या सोडल्या आहेत. त्यासाठीचे बुकींग फुल झाल्याने सगळ्यांचे लक्ष गणपती स्पेशल ट्रेनकडे होते. अखेर आज गणपती विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने 246 गणपती विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 184 आरक्षित आणि 62 अनारक्षित मेमू विशेष गाड्या असणार आहे. या गाड्यांच्या सीएसएमटी, एलटीटी, पुणे आणि दिवा येथून विशेष फेऱ्या धावणार आहेत. सावंतवाडी रोड, रत्नागिरी, मडगाव, खेड आणि चिपळूणसाठी या गाड्या सेवा देणार आहे. यात सीएसएमटीहून ९८, एलटीटीहून ७६, पुण्याहून १० फेऱ्या असणार आहेत. दिवा-खेड ३२ आणि दिवा-चिपळूण ३० मेमू विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून – नियमित मेल-एक्स्प्रेसवरील गर्दी कमी करण्याचा उद्देश आहे. या घोषणेने आरक्षण न मिळालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा आहे. गणपती स्पेशल आरक्षित विशेष गाड्यांचे बुकिंग 1 ऑगस्ट 2026 पासून सूरू होणार आहे. आयआरसीटीसी आणि सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तिकिटे उपलब्ध करण्यात आली आहे. जर प्रवाशांची मागणी वाढल्यास आणखी विशेष गाड्यांचा सोडण्याचा विचार मध्य रेल्वे करत असल्याची माहिती आहे.यामुळे चाकरमान्यांना दिलासा मिळाला आहे.
कोणत्या मार्गावर किती विशेष गाड्या ?
सीएसएमटी – सावंतवाडी रोड : ६६ फेऱ्या
सीएसएमटी – रत्नागिरी : ३२ फेऱ्या
एलटीटी – सावंतवाडी रोड : ४६ फेऱ्या
एलटीटी – रत्नागिरी : २२ फेऱ्या
एलटीटी – मडगाव : ८ फेऱ्या
पुणे – रत्नागिरी : १० फेऱ्या
दिवा – खेड (मेमू) : ३२ फेऱ्या
दिवा – चिपळूण (मेमू) : ३० फेऱ्या

Post Views: 8