- श्री राधाकृष्ण मंदिरात प्रभू श्री जगन्नाथ यांचे आगमन, भाजपा प्रदेशअध्यक्ष रवींद्र चव्हाण हे रथयात्रेत सहभागी ।
डोंबिवली : डोंबिवलीतील श्री राधाकृष्ण मंदिरात प्रभू श्री जगन्नाथ यांचे आगमन झाले. मंदिरात श्री जगन्नाथ यांचे विधिवत पूजन आणि इतर धार्मिक सोहळे संपन्न झाले. त्यानंतर फडके रोडवरील श्री गणेश मंदिरापासून रथयात्रेला शुभारंभ झाला. भाजपा प्रदेशअध्यक्ष रवींद्र चव्हाण हे रथयात्रेत सहभागी झाले. श्री गणेश मंदिरापासून सुरू झालेल्या या रथयात्रेची रिजन्सी अनंतम येथे सांगता झाली. याप्रसंगी भगवंताचा रथ ओढत असंख्य भाविक भक्तिरसात तल्लीन झाले होते. ‘जय जगन्नाथ’ या नामघोषात डोंबिवली शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. या रथयात्रा सोहळ्याच्या आयोजनात ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’, ‘इस्कॉन नवी मुंबई’ यांच्यासह ‘सकल उत्कल समाज’, ‘श्री राधाकृष्ण सेवा संस्था’, ‘रिजन्सी अनंतम उत्सव समिती’ इ. संस्थांचा प्रामुख्याने सहभाग होता. तसेच या रथयात्रेमध्ये अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते ।
