- ८५ रिक्षा व इतर दुचाकी वाहने तपासून एकूण ७३ वाहनांवर मोटर वाहन कायदा 1988 चे कलमाअंतर्गत ई चलन मशीनद्वारे कारवाई ।
डोंबिवली : कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व डोंबिवली वाहतूक पोलीस यांनी शुक्रवार १७ तारखेला डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक, रामनगर रिक्षा स्टॅन्ड डोंबिवली पश्चिम मच्छी मार्केट, महात्मा फुले चौक येथे संयुक्त मोहीम राबविली. या कारवाईत एकूण ८५ रिक्षा व इतर दुचाकी वाहने तपासून एकूण ७३ वाहनांवर मोटर वाहन कायदा 1988 चे कलमाअंतर्गत ई चलन मशीनद्वारे कारवाई करण्यात आली. या कारवाईत ६१५०० रुपये दंड आकारण्यात आला. सदर कारवाई करीत असताना रिक्षा आणि इतर वाहनांचे फिटनेस, इन्शुरन्स, पियूसी, परमिट, गणवेश बॅच इत्यादी तपासून दोषींवर कारवाई करण्यात आली आहे, सदर कारवाई वेळी डोंबिवली वाहतूक उपविभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय अहिरे, पोलीस उपनिरीक्षक कैलास घोलप व अंमलदार तसेच कल्याण आरटीओचे मो. वा. निरीक्षक आमते, मो. वा. निरीक्षक मांजरे, सहा. मो. वा. निरीक्षक भुसे, चालक आव्हाड यांनी संयुक्त कारवाई करण्यात आली आहे ।
