अश्लील पाठवले  व्हिडिओ, २६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याविरोधात  गुन्हा दाखल ।

अश्लील पाठवले  व्हिडिओ, २६ वर्षीय विवाहितेचा विनयभंग, बजरंग दलाच्या कार्यकर्त्याविरोधात  गुन्हा दाखल ।
डोंबीवली : डोंबिवलीतील एका २६ वर्षीय विवाहित युवतीला मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून तसेच अश्लील संदेश आणि शरीरसुखाची मागणी करत तिच्या विनयभंगाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण उल्लेगल (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, तो बजरंग दलाचा कार्यकर्ता तसेच कल्याण विभाग संयोजक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारदार युवती ही डोंबिवली पूर्वेतील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असून तिचे लग्न झालेले आहे. गेल्या चार महिन्यांपासून ती पतीपासून विभक्त राहत आहे. आरोपी करण उल्लेगल हा तक्रारदार युवतीच्या काकांचा मित्र असल्याने गेल्या सुमारे २० वर्षांपासून दोन्ही कुटुंबांची ओळख आहे. या परिचयाचा गैरफायदा घेत आरोपीने मागील चार महिन्यांपासून युवतीशी संवाद वाढविल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. आपल्या परिचयाचा फायदा उठवेल याची थोडी सुद्धा भनक विवाहित महिलेला नव्हती  बुधवारी मध्यरात्रीनंतर सुमारे पावणे दोनच्या सुमारास आरोपीने युवतीच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठविल्याचा आरोप आहे. त्यानंतर अश्लील स्वरूपाचे संदेश पाठवत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. तक्रारदार युवती आरोपीला “दादा” म्हणून संबोधत होती. तिने “तू माझ्यासाठी दादासारखा आहेस,” असे सांगून त्याच्या वर्तनावर आक्षेप घेतला असता, “मला भावना येऊ शकत नाहीत का?” असे म्हणत आरोपीने आणखी आक्षेपार्ह संदेश पाठविल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसलेल्या युवतीने रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी करण उल्लेगल याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये विनयभंगाचा , इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी प्रतिबंध कायदा, गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपी बजरंग दलाचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर आल्याने या प्रकरणाची राजकीय व सामाजिक स्तरावरही चर्चा सुरू झाली आहे. राज्यात आणि पालिकेत यांची सत्ता असल्यामुळे यांना माज आलाय का अशी चर्चा कल्याण डोंबिवलीमध्ये होत आहे.