आठ हजार कामगारांना गृहउपयोगी वस्तूचे वाटप ।

  • आठ हजार कामगारांना गृहउपयोगी वस्तूचे वाटप ।

डोंबिवली : महाराष्ट्र शासनाच्या वतीने हक्काची कामगार मजदूर संघटना सलंग्न भारतीय जनता कामगार आघाडी यांच्या माध्यमातून गुरुवार १६ तारखेला डोंबिवली पूर्वकडील स्व. आनंद दिघे सभागृहात एक हजार कामगारांना गृहोपयोगी वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदू परब, नगरसेवक महेश पाटील, दत्ता माळेकर, डॉ. अमित दुखंडे यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हक्काची कामगार मजदूर संघटना संस्थापक – अध्यक्ष महादूसिंग राणा शेठ म्हणाले, आतापर्यंत आठ हजार कामगारांना गृहउपयोगी वस्तूचे वाटप केले आहे. यावर्षी कमीतकमी पन्नास लाख रुपये मिळवून दिले आहेत. महाराष्ट्र शासनाकडून यावर्षी इंजिनिअरिंग शिक्षणासाठी २७ कामगारांना प्रत्येकी साठ हजार रुपये मिळवून दिले. वैद्यकीय शिक्षणासाठी सात कामगारांना एक एक लाख रुपये मिळवून दिले आहेत. कामगारांना काही अडचण असल्यास ती दुर करण्याकरता त्याच्या मागे आमची संघटना आणि भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभी आहे. हा जो कार्यक्रम राबविण्यात आला आहे तो भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. तसेच राज्य शासनाची अनेक योजना कामगारांपर्यंत पोहचविण्यासाठी आमची संघटना करीत आहेत. यावेळी संघटनेचे युवा अध्यक्ष योगेश ठोंबरे, उपाध्यक्ष मिठू पवार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजिवनी माने, खजिनदार हरीभाऊ कोल्हे, कौशल शहा, करण राजपूत, अशोक चव्हाण, सज्जन राजपूत, अमर राजपुज, नवनाथ माने गणेश महाजन आदीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ।