- गोपीनाथ चौक येथे कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२, डोंबिवली पश्चिम येथे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी गगनगिरी आर्केड सोसायटी, गोपीनाथ चौक येथे कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या आधार सेवा केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य डॉ.रासिका पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसे नगरसेवक संदेश पाटील, शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक विकास म्हात्रे, कैलास डोंगरे तसेच आधार सेवा केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक विकास म्हात्रे म्हणाले की, “प्रभाग क्रमांक २२ मधील नागरिकांसाठी तसेच सर्व डोंबिवलीकरांसाठी ही आनंदाची बाब आहे. कायमस्वरूपी आधार सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे नागरिकांना आता आधारसंबंधित सेवा सहज उपलब्ध होणार असून त्यांना मोठे सहकार्य मिळेल.” तर सुमारे 45 ते 50 हजरांची लोकसंख्या प्रभाग क्र. 22 मध्ये असून नागरिकांना अनेक कामांसाठी आधारकार्डमध्ये बदल अथवा बायोमॅट्रीक करावे लागते. डोंबिवली पश्चिमेत एकाच ठिकाणी आधारकार्ड केंद्र सुरू असल्याने गैरसोय होत होती आता या आधारसेवा केंद्रामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती नगरसेवक संदेश पाटील यांनी दिली ।
