भरस्त्यात महिलांसमोर भररस्त्यात कार चालकाची अश्लील कृती. शिवसेना ठाकरे गट आक्रमक 

  • भरस्त्यात महिलांसमोर भररस्त्यात कार चालकाची अश्लील कृती. शिवसेना ठाकरे गट आक्रमक 
कल्याण : कल्याण पश्चिमेतील मधील हायप्रोफाईल वायले नगर परिसरात महिलांसमोर एका कार चालकाने भररस्त्यात लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संबंधित चालकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली असून अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेदहाच्या सुमारास एका दुकानासमोर ट्रॅव्हल्स कार येऊन थांबली. त्या दुकानात महिला उपस्थित होत्या. कार चालक खाली उतरला आणि जवळच्या दुकानातून पाण्याची बाटली खरेदी केली. त्यानंतर तो कारसमोर जाऊन उघड्यावर लघुशंका करू लागला. हा प्रकार पाहून दुकानातील महिलांनी आणि स्थानिकांनी त्याला जाब विचारला. मात्र चालकाने उलट महिलांनाच शिवीगाळ केली आणि कारमध्ये बसून घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी  राजेश लोंढे यांनी संबंधित कारचा फोटो आणि नंबर कल्याण वाहतूक विभागाला पाठवला आहे. तसेच या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात येथे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. घटनेनंतर महिलांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे. “दिवसाढवळ्या अशा घटना घडत असतील तर महिलांच्या सुरक्षेचे काय?” असा सवाल स्थानिक महिलांनी उपस्थित केला आहे. संबंधित चालकाला तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. आता या प्रकरणात कल्याण वाहतूक पोलीस आणि खडकवाड पोलीस  कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान कल्याण मध्ये भर रस्त्यात  महिलांसमोर लघुशंका करणाऱ्या कार चालकाला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे प्रीतम पांडे असे या कारचालकाचे नाव आहे प्रीतम पांडे याचा म्हणणं आहे की मी तिकडे लघुशंका केली नाही फक्त तोंड धुतलं नंतर त्याने कबुली दिली की मी केला आहे या प्रकरणात आता पोलिसांनी त्याला नोटीस बजावून कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. खडकपाडा पोलिसांनी पुढील तपास सुरू आहे ।