डोंबिवलीकर कला आणि सांस्कृतिक केंद्राचा भूमिपूजन सोहळा संपन्न ।

  • डोंबिवलीकर कला आणि सांस्कृतिक केंद्राचा भूमिपूजन सोहळा संपन्न ।

डोंबिवली : भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार होणाऱ्या डोंबिवलीकर कला आणि सांस्कृतिक केंद्राचा भूमिपूजन सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रविंद्र चव्हाण व त्यांच्या पत्नी सौ. सुहासी रविंद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते शनिवारी डोंबिवली एमआयडीसी संकुलातील मिलाप नगर येथे उभारण्यात येणाऱ्या डोंबिवलीकर कला आणि सांस्कृतिक केंद्राचा भूमिपूजन सोहळा पार पाडला. ही सुविधा डोंबिवलीच्या सांस्कृतिक समृद्धीचे प्रतीक ठरेल आणि डोंबिवलीवासीयांसाठी अभिमानाचा स्रोत असेल. हे केंद्र कला, साहित्य, नाटक, नृत्य, संगीत आणि सर्व कलाकारांसाठी एक व्यासपीठ असेल. तसेच ते उदयोन्मुख कलाकारांना नवी आशा आणि संधी उपलब्ध करून देईल. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद चव्हाण म्हणाले, डोंबिवलीकर कला आणि सांस्कृतिक केंद्र ही केवळ एक इमारत नसून, डोंबिवलीच्या कला आणि संस्कृतीचे मंदिर असेल. ते नाटक, संगीत, नृत्य आणि साहित्याच्या सर्व प्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देईल. येथे नवीन कलाकारांना ओळख मिळेल. ही डोंबिवलीवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. यावेळी उपमहापौर राहुल दामले, भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, डोंबिवलीकर मासिकाचे कार्यकारी संपादक प्रभू कापसे, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक, भाजपा मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते ।