माजी आमदार सुभाष भोईर यांच्या लोकसेवा कार्यालय उद्घाटन सोहळा

  • माजी आमदार सुभाष भोईर यांच्या लोकसेवा कार्यालय उद्घाटन सोहळा
  • भाजपा प्रदेशाध्यक्ष, आमदार रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते संपन्न

डोंबिवली : डोंबिवली नेकनीपाडा येथे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या नवीन लोकसेवा कार्यालयाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन रविंद्र चव्हाण साहेब (प्रदेशाध्यक्ष – भाजप, आमदार – डोंबिवली विधानसभा) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रसंगी आमदार अॅड. निरंजन डावखरे, सुलभाताई गणपत गायकवाड, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, जिल्हाध्यक्ष नंदू परब, उपमहापौर राहुल दामले, गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक महेश पाटील, जेष्ठ नेते सदानंद थरवळ, संतोष केणे, नगरसेविका सुनिता पाटील, पूजा म्हात्रे, अलका म्हात्रे, आर्या नाटेकर, कविता म्हात्रे, सायली विचारे, वेदिका पाटील, मंदा पाटील, विजश्री म्हात्रे, प्रमिला पाटील, रविना म्हात्रे, ज्योती पाटील, नगरसेवक मंदार टावरे, विनोद काळण, जालिंदर पाटील, विशू पेडणेकर, नंदू म्हात्रे, भाजपा मंडळ अध्यक्ष मितेश पेणकर, लक्ष्मण पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, माजी ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी, माजी नगरसेवक मनोज घरत, तसेच कार्यक्रमास मान्यवर, कार्यकर्ते व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रमाला विशेष उंची लाभली. जनसंपर्काच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला ।