- नगररचना विभागात नियमबाह्य नियुक्त्या अधिकाऱ्यांनी ११० फाईल्सला दिली मंजूरी!…
- विधानसभेत आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रश्न विचारल्यावर झाला खुलासा !

डोंबिवली: कल्याण डोंबिवली महापालिकेत बेकायदेशीर नियुक्त्या झाल्याचे समोर आले आहे.नगर रचना विभागात फाईल चोरीची प्रकरणे बाहेर येत असताना आता या बेकायदेशीर नियुक्त्या झाल्याची चर्चा होत असताना दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी विधानसभेत या प्रकरणी प्रश्न विचारला असता या बेकायदा नियुक्त्या झाल्याचे समोर आले आहे. जी पदे अस्तित्वात नसताना ही बेकादेशीर पदे निर्माण करण्यात आल्याचा खुलासा या प्रकरणी झाला आहे. शासनाची मंजुरी व स्वीकृत आकृतीबंध नसताना “टाऊन प्लॅनिंग डेव्हलपमेंट ऑफिसर ” “डेप्युटी इंजिनिर ” अशी पदे निर्माण केली गेली व त्या वर अधिकारांच्या नियुक्त्या केल्या गेल्या. दीड वर्षापूर्वी तत्कालीन आयुक्त आणि नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी ही पदे निर्माण केल्याचे या प्रकरणी समोर आले आहे. अधिसंख्य पदावर महापालिकेत काम करीत असलेल्या सुरेंद्र टेंगळे यांना ‘टाऊन प्लॅनिंग डेव्हलपमेंट ऑफिसर” दीपक मोरे व सुहास पवार यांना “डेप्युटी इंजिनिर” म्हणून नियुक्त करण्यात आले.या प्रकरणी समजते की ऑगस्ट २०२५ ला सहाय्यक संचालक संतोष डोईफोडे यांनी आदेश जारी करून सुरेंद्र टेंगळे यांना “टाऊन प्लॅनिंग डेव्हलपमेंट ऑफिसर” व दीपक मोरे व सुहास पवार यांना डेप्युटी इंजिनिअर नियुक्त केले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले की, अशा प्रकारे शासनाने कोणत्याही पदाला मंजुरी दिलेली नाही आणि अधिकारीकरित्या अशा पद निर्मितीचा कोणताही निर्णय झालेला नाही. या बोगस पदोन्ती प्रकरणी आमदार शशिकांत शिंदेंनी आरोप केला की, कल्याण डोंबिवली महापालिकेने कोणतीही सरकार कडून परवानगी न घेता ही पदे निर्माण केली गेली आणि या अधिकाऱ्यांनी नगररचना विभागाच्या ११० फाईल ला मंजुरी दिली. या वेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी विचारले की या बाबत अनियमितता झाली आहे का? आणि याची चौकशी होऊन कारवाई केली जाईल का?
