राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) प्रदेश सचिव वल्ली एस. राजन यांनी कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर ॲड. सौ. हर्षाली ताई चौधरी यांची सदिच्छा भेट घेतली ।

  • राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) प्रदेश सचिव वल्ली एस. राजन यांनी कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर ॲड. सौ. हर्षाली ताई चौधरी यांची सदिच्छा भेट घेतली ।

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) प्रदेश सचिव वल्ली एस. राजन यांनी कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या नवनियुक्त महापौर ॲड. सौ. हर्षाली ताई चौधरी यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली कल्याण–डोंबिवली शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने कल्याण–डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात एनसीपीएसपी प्रदेश सचिव वल्ली एस. राजन यांनी महापौरांना निवेदनही सादर केले. स्व. अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राज्याच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला मोठी चालना मिळाली आणि जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष आदर व प्रेम निर्माण झाले. त्यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्याचा सकारात्मक निर्णय महानगरपालिका प्रशासन घेईल, अशी अपेक्षा वल्ली एस. राजन यांनी व्यक्त केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – विमुक्त भटक्या जमाती सेलचे कल्याण जिल्हाध्यक्ष दिनेश परदेशी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, कल्याण–डोंबिवली जिल्हा (अजित पवार गट) पक्षाचे सरचिटणीस संतोष सरस्वती बळीराम पाटील उपस्थित होते ।