थकित मालमत्ता करदात्यांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कारवाईचा बडगा – नळजोडणी तोडणे , मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू ।

  • थकित मालमत्ता करदात्यांवर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कारवाईचा बडगा – नळजोडणी तोडणे , मालमत्ता सील करण्याची कारवाई सुरू ।

डोंबिवली : थकित मालमत्ता कर न भरणाऱ्या करदात्यांविरोधात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आता कडक भूमिका घेत कारवाईचा बडगा उगारला आहे. कर वसुलीला गती देण्यासाठी महानगरपालिकेने थकबाकीदारांवर थेट कारवाई सुरू केली असून नळजोडणी तोडणे आणि मालमत्ता सील करण्यासारख्या कठीण उपाययोजना करण्यात येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्रोत प्रमुख मालमत्ता कर आणि पाणी पट्टी असून उत्पन्न वाढवण्यासाठी अधिकारी कर्मचारी कामाला लागले आहे . सन २०२५ – २६ या आर्थिक वर्षातील कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी थकित करदात्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती केली जात आहे. तरीही काही करदाते जाणूनबुजून मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करत असल्याने महानगरपालिकेने विशेष वसुली मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत नळजोडणी तोडणे,मालमत्ता सील करणे अशा कठोर कारवायांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत सुमारे २२३ नळजोडण्या तोडण्यात आल्या असून ५३८ मालमत्ता सील करण्यात आल्या आहे. याशिवाय थकबाकीदारांच्या मालमत्तेचा लिलाव करून थकीत कर वसूल करण्याची प्रक्रिया देखील राबविण्यात येणार आहे. तसेच संबंधित प्रभागामध्ये थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याचाही इशारा देण्यात आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र ३१ मार्च २०२६ पर्यंत सार्वजनिक सुट्ट्या ,शनिवारी आणि रविवारी देखील सुरू ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सर्व थकबाकीदारांनी आपली मालमत्ता व नळजोडणी सुरळीत ठेवण्यासाठी त्वरित मालमत्ता कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन उप आयुक्त ( कर ) बाळासाहेब चव्हाण यांनी केले आहे ।