कल्याण तहसीलदार कार्यालयात एका तासात फेरफार आणि सातबारा ,भाजप पदाधिकारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार ।

  • कल्याण तहसीलदार कार्यालयात एका तासात फेरफार आणि सातबारा ,भाजप पदाधिकारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार ।

डोंबीवली : कल्याण पश्चिमेतील तहसीलदार कार्यालयाला काही महिन्या पूर्वी तहसीलदार यांना लाखाची खंडणी ,लाच घेताना अटक केली होती हे प्रकरण ताजे असताना आता एका तासात बारावे गोदरेज पार्क मधील १२/३ सर्व्हे नंबर वर सात बारा आणि फेरफार वर नवीन नोंदणी झाली असल्याची धक्कादायक प्रकार भाजप कल्याण उपाध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी आरोप करीत तहसीलदार यांना जबाबदार धरले असून या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रतिवादी करणार असल्याची माहिती दिली आहे ।कल्याण पश्चिमेतील बारावे येथील गोदरेज पार्क जवळ सर्व्हे नंबर १२/३ ,या भूखंडावर सात बारा आणि फेरफार वर नवीन नोंदणी एका तासात केली आहेत शेतकरी राजाराम सीताराम मिरकुटे यांना व्हील पत्राने भूखंड मिळाला होता त्यानंतर त्यांनी मुलांची व्हील पत्राने नावे दाखल केली . सर्व्हे नंबर १२/३ भूखंड भाजप उपाध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी डेव्हलप (विकास)करण्यासाठी घेतला त्यावर बोजाही दाखल होता मात्र एका तासात त्या भूखंडावर काही जणांची नावे नोंदणी करण्यात आली हा प्रकार धक्कादायक असून याबद्दल म्हात्रे आक्रमक झाले असून सातबारा आणि फेरफार दाखल करताना वारसांची नावे वृत्तपत्रात पंधरा दिवस मुदत दिली जाते हरकत घेण्यासाठी मात्र असे कुठलाही प्रकार न घडता थेट सातबारावर आणि फेरफार वर काही नावे नोंद करण्यात आली. तहसीलदार विलास गरुडकर हे जबाबदार असून आपण राज्यच मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री माहिती देणार असून थेट मुंबई उच्च न्यायालयात तहसीलदार यांच्या विरोधात याचिका दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे दरम्यान या प्रकरणाबद्दल तहसीलदार विकास गरुडकर यांना विचारले असता संबंधी प्रकरणाची प्रक्रियेची माहिती घेऊन कर्मचाऱ्याने कशाप्रकारे नोंदी केली याची माहिती घेत असून त्यानंतर आपल्याला माहिती देणार असल्याची सांगितले ।