भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी तिरंगा फडकवत अभियानात सहभाग नोंदवला ।

  • भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी तिरंगा फडकवत अभियानात सहभाग नोंदवला ।

डोंबिवली : हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी तिरंगा फडकवत अभियानात सहभाग नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत चव्हाण यांच्या पत्नी सुहासी चव्हाण तसेच सुकन्या सलोनी आणि खुशी यांनी उत्साहाने तिरंगा फडकवला. यावेळी भारतभूमी आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला मानवंदना अर्पण करण्यात आली. ‘घराघरावर फडकणारा राष्ट्रीय ध्वज हा देशप्रेम, एकता आणि अखंडतेचे जिवंत प्रतीक आहे,’ असे रविंद्र चव्हाण यांनी पोस्टमध्ये म्हटले. कुटुंबातील पुढील पिढीनेही राष्ट्रभक्तीच्या उपक्रमात सहभागी होणे ही देशभक्तीचे संस्कार दृढ करणारी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांनीही आपल्या घरी तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. अभियानाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या निवासस्थानी तिरंगा फडकवत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. नागरिकांनीही आपल्या घरावर तिरंगा फडकवून ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी व्हावे, तसेच देशभक्तीची भावना जागृत ठेवावी, असे आवाहन करण्यात आले ।