- शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्ह्यात २३ वा क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याचा संत नामदेव प्राथमिक विद्यालयात सत्कार
डोंबिवली : संत नामदेव प्राथमिक विद्यालय, शाळा क्रमांक ६७, कुंभारखान पाडा, डोंबिवली (प.) येथील इयत्ता चौथीतील विद्यार्थी कुमार वेदेश मंजुनाथ नाईक याने शिष्यवृत्ती परीक्षेत ठाणे जिल्ह्यात २३ वा क्रमांक मिळवत गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केल्याबद्दल आज शाळेत त्याचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास कडोमपा शिक्षण समितीचे सभापती अभिजीत थरवळ, स्थानिक नगरसेवक प्रल्हाद म्हात्रे, सौ. अपर्णा भोईर, प्रशासन अधिकारी भरत बोरनारे तसेच शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थी कुमार वेदेश नाईक याचा पुष्पगुच्छ व विविध भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. स्थानिक नगरसेवक मा. श्री. प्रल्हाद म्हात्रे यांनी कुमार वेदेश नाईक यास प्रोत्साहनपर म्हणून रोख रु. ५,०००/- रकमेचे बक्षीस देऊन त्याचा गौरव केला. विद्यार्थ्याने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या ।
