- महापौर अॅड. हर्षाली चौधरी – थवील यांनी यांची गणेशघाट पाहणी दौरा ।
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका महापौर अॅड. हर्षाली चौधरी – थवील यांनी मंगळवार ११ तारखेला डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव आणि देवीचा पाडा परिसरात खाडी किनारी जलवाहतूक व रो-रो बोट प्रकल्पासाठी जेट्टीच्या कामाची आणि गणेश उत्सवापूर्वी गणेशघाट यांची पाहणी दौरा केला. यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, उपआयुक्त गोडसे, अभियंता सांगळे, सहाय्यक आयुक्त अभिमान पवार, राहुल गणफुले, संजय निक्ते, योगेश भोईर उपस्थित होते. यावेळी महापौर अॅड. हर्षाली चौधरी थवील म्हणाल्या, जेट्टीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, यामुळे डोंबिवलीकरांना ठाणे, नवी मुंबई आणि वसईसाठी नवीन जलमार्ग मिळणार आहेत तसेच गणेश उत्सवा पूर्वी शहरातील सर्व रस्ते खड्डे मुक्त आणि गणेशघाट स्वच्छ करण्यात येतील ।
