शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश ।

  • शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश ।

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीतील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून युतीतील अंतर्गत मतभेदांची चर्चा रंगू लागली आहे. रविवारी डोंबिवली येथील भाजप कार्यालयात शिवसेना (युवासेना) पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी भाजपाचे गटनेते शशिकांत कांबळे, नगरसेवक महेश पाटिल यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पक्षप्रवेशानंतर बोलताना नंदू परब यांनी, “आमची कासवाची चाल आहे, पण शेवटी जिंकणार आम्हीच,” असे म्हणत आगामी राजकीय समीकरणांबाबत सूचक विधान केले. या पक्षप्रवेशामुळे कल्याण-डोंबिवलीतील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त होत असून, आगामी स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची चर्चा सुरू झाली आहे ।