पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेले ४३ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले ।

  • पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेले ४३ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले ।

अंबरनाथ : अंबरनाथ पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेले ४३ मोबाईल फोन शोधून त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात दिले आहेत. सन २०२२ ते २०२६ या कालावधीत हरविलेल्या मोबाईल संदर्भातील तक्रारींचा CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलद्वारे मागोवा घेत ही कारवाई करण्यात आली. या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १० लाख ७५ हजार रुपये आहे. पोलीस उपआयुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अर्चना कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई मंगेश सूर्यवंशी यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. मोबाईलचे वितरण पोलीस उपआयुक्त सचिन गोरे यांच्या हस्ते करण्यात आले ।