- विष्णुनगर पोलीसांच्या डीबी पथकाची कारवाई, सराईत वाहन चोराला अटक, २ रिक्षा आणि १ स्कुटी जप्त ।
डोंबिवली : विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने रिक्षा चोरीच्या प्रकरणातील सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून २ रिक्षा आणि १ स्कुटी असा एकूण २,७०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णुनगर पोलीस ठाण्यात दाखल रिक्षा चोरीच्या गुन्ह्यात आरोपी आदर्श रोहिदास बागडे, वय २५वर्षे, राहणार कुंभार खानपाडा, डोंबिवली पश्चिम यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून या गुन्ह्यात चोरी झालेली रिक्षा हस्तगत करण्यात आली. पुढील तपासात त्याच्याकडून अंबरनाथ पोलीस ठाण्यातून चोरीला गेलेली स्कुटी आणि सेंट्रल पोलीस ठाण्यातून चोरीला गेलेली रिक्षा देखील जप्त करण्यात आली. हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या गुन्हे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे ।
