तुकाराम निवास’ ही इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिचा काही भाग कोसळण्यास ।

  • तुकाराम निवास’ ही इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिचा काही भाग कोसळण्यास ।

डोंबिवली : डोंबिवलीतील जुनी डोंबिवली परिसरातील ‘तुकाराम निवास’ ही इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असून तिचा काही भाग कोसळण्यास सुरुवात झाली आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस, पाणीपुरवठा विभाग आणि महावितरणचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. प्रशासनाकडून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आली असून परिसरात सुरक्षेचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी संबंधित परिसरात अनावश्यक गर्दी करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासन तसेच पोलीस विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे ।