डोंबिवली मोठागाव एलसी-१ उड्डाणपूल प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला गती; केडीएमसीचे आभार – दिपेश पुंडलीक म्हात्रे

  • डोंबिवली मोठागाव एलसी-१ उड्डाणपूल प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेला गती; केडीएमसीचे आभार – दिपेश पुंडलीक म्हात्रे

डोंबिवली : डोंबिवली मोठागाव येथील एलसी-१ (रेल्वे उड्डाणपूल) प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्वी रद्द झाल्यानंतर हा महत्त्वपूर्ण प्रकल्प पुन्हा मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल स्थायी समिती सदस्य दीपेश पुंडलीक म्हात्रे यांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत. मोठागाव एलसी-१ उड्डाणपूल हा डोंबिवली शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतूक व्यवस्थेला गती देणारा प्रकल्प आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांना रेल्वे फाटक आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर हजारो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सदर प्रकल्प दोन पदरी न राहता भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन चार पदरी स्वरूपात विकसित व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत. शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी आणि वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील असून प्रशासनानेही त्यास प्राधान्य देणे आवश्यक आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला लवकरात लवकर सुरुवात व्हावी आणि प्रकल्प निश्चित वेळेत पूर्ण व्हावा यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे दीपेश पुंडलीक म्हात्रे यांनी सांगितले ।