स्वस्त घरांचे आमिष दाखवत गरजू नागरिकांना लाखोंचा गंडा घालणारया खोणी धामटण येथील साई माऊली कन्स्ट्रक्शनचे सर्व्हेसर्वा चाळमाफिया मनोज धुमाळ,सचिन सुर्वे गजाआड, मानपाडा पोलिसांची कारवाई ।

  • स्वस्त घरांचे आमिष दाखवत गरजू नागरिकांना लाखोंचा गंडा घालणारया खोणी धामटण येथील साई माऊली कन्स्ट्रक्शनचे सर्व्हेसर्वा चाळमाफिया मनोज धुमाळ,सचिन सुर्वे गजाआड, मानपाडा पोलिसांची कारवाई ।

डोंबिवली : कल्याण ग्रामीण कल्याण शहरी भाग आणि डोंबिवली परिसरात मोठ्या प्रमाणात स्वस्त घरांचे आमिष दाखवून गरजू नागरिकां कडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या दोन चाळमाफीयांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्यातआहेत. मानपाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोन भूमाफिया गजाआड केले आहे . शासकीय भूखंडावर चाळी बांधून तीन रूम विकण्यासाठी अनेक जणांना लाखोचा गंडा घातला आहे त्यात मनोज धुमाळ,सचिन सुर्वे अशी अटक करण्यात आलेल्या दोन चाळमाफीयांची नावे आहेत.डोंबिवली जवळील खोणी धामटण येथील साई माऊली कन्स्ट्रक्शनचे नावाखाली संरक्षण खात्याच्या जमिनीवर या दोघांनी तीन रूम बांधल्या होत्या .या रूम दाखवत अशाच रूम तुम्हाला स्वस्तात देतो असे आमिष दाखवत जवळपास २००ते २५० नागरिकांकडून २लाख तर कुणाकडून ४ लाख असा मिळून कोट्यवधींचा गंडा घातल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मानपाडा पोलिसांना गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी याप्रकरणी पसार झालेल्या मनोज धुमाळ व सचिन सुर्वे या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत ।