कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा संपन्न।

  • कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची स्थायी समितीची सभा संपन्न।
  • काही विषयांना स्थगिती , कोट्यवधींच्या कामांना मंजुरी ।

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा २४ एप्रिल २०२६ रोजी दु. २ वा. दरम्यान महापालिका भवनातील स्थायी समिती सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी स्थायी समिती सभापती मलेश शेट्टी होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड, योगेश गोडसे उपायुक्त (आरोग्य) प्रसाद बोरकर, महापालिका सचिव किशोर शेळके, शहर अभियंता अनिता परदेशी,सहाय्यक अभियंता जगदीश कोरे,सांगळे ,सहाय्यक आयुक्त,आरोग्य अधिकारी डॉ.दीपा शुक्ला यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या सभेत एकूण ३५ विषय मंजुरीसाठी मांडण्यात आले. मात्र आरोग्य व रुग्णालयाशी संबंधित शेड्युल क्रमांक १ ते १४ मधील औषधे, साहित्य, उपकरणे खरेदी संदर्भातील १४ विषयावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली. या सर्व खरेदी प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती, संबंधित कंपन्यांची नावे व औषधाची गुणवंत याबाबत संपूर्ण तपशील सादर करण्याचे आदेश सभापती मलेश शेट्टी यांनी प्रशासनाला दिले . दरम्यान, उर्वरित महत्वाच्या विकास कामांना स्थायी समितीने मंजुरी दिली. यामध्ये डोंबिवली पूर्व आयरे – पांडुरंगवाडी येथील ९० क्षमतेच्या बेघर निवारा केंद्राच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी में.गुरुकृपा विकास संस्था ,कल्याण यांना सुमारे १,२७,७६,०४० कोटीचा ठेका देण्यात आला आहे. तसेच डोंबिवली प. ” ह ” प्रभाग क्षेत्राच्या नागरी सुविधा केंद्राचे नुतीकरण, मानेरे,काटेमानेवली येथील शासकीय भूखंडाभोवती संरक्षण भिंत, फडके मैदान नाल्यावर काँक्रिट स्लॅब बांधकाम, दावडीतील विश्वकर्मा समाज मंदिर परिसरातील कामे आधी विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. महापालिका क्षेत्रातील विविध प्रभागामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे तसेच २६-२०२७ या वर्षात अ,ब , क, ड,जे,फ, ग ,ह ,ई , आय , प्रभागातील मोठ्या नाल्यांच्या साफसफाईच्या कामासाठीही कोट्यावधींची ठेके मंजूर करण्यात आले. याशिवाय कल्याण पूर्व टाटा पॉवर ते मोहन सृष्टी मार्गावरील ३० मीटर रुंद रस्ता तसेच विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन ते रोशन पेट्रोल पंप दरम्यान प्रस्तावित उड्डाणपुलासाठी बाधित बांधकाम धारकांना टीडीआर ,एफएसआय किंवा रोख स्वरूपात नुकसानभरपाई देण्यासही स्थायी समितीने मंजुरी दिली.पालिका प्रशासनाने पाऊस येण्यापूर्वीच नाल्याची सफाई करून घ्यावी अशी सूचना स्थायी समिती सभापती मलेश शेट्टी यांनी दिली ।