- आधारवाडी कारागृहा बाहेर भाईचा वाढदिवस साजरा करणे महागात,चार जणांवर गुन्हा आरोपी गजाआड
डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी कारागृहा बाहेर गुन्ह्याचा आरोपीचा वाढदिवस फटाके वाजून साजरा केल्या प्रकरणी पोलिसांच्या कामात अडथळा आणल्या च्या गुन्ह्यात चार आरोपीवर खडक पाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे तीन आरोपींना तपासणी नंतर अटक करण्यात आले आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली आहे । कल्याण पश्चिमेतील आधारवाडी जेलच्या बाहेर “भाई का बर्थडे या बर्नर खाली फटाके वाजून साजरा करण्यात आला . मात्र हे कृत्य चार जणांच्या अंगलट आला आहे . जेल प्रशासनाने सरकारी कामात अडथळा आणून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले शनिवारी रात्री ता.१४ ही घटना घडली होती त्यानंतर तीन जणांना पोलिसांनी अटक केली असून ते सराईत गुन्ह्याचे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे । फटाके फोडणारे “भाई”चे सहकारी, पंटर गजाआड ,खडकपाडा पोलिसांची कारवाई ,रोहित जगदाळे ,क्षितिज भगत ,आकाश खडसे तिघांना अटक केली आहे त्यातील एक आरोपी फरार आहे .आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली .त्यानंतर तीन आरोपींना जेलपरिसरात पोलिसांनी धिंड काढली आणि पोलिसांची जरप असल्याचे दाखवून दिले या प्रकरणाचा तपास पोलिस अधिकारी वाघमारे करीत असल्याची माहिती पोलिस सहायक आयुक्त कल्याणजी घेटे यांनी दिली आहे ।
