- महापालिकेतर्फे सद्भावना दिनी घेतली शपथ !
कल्याण : शासन परिपत्रकाच्या अनुषंगाने आज सद्भावना दिनानिमित्त महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात सद्भावना दिवसाची शपथ घेण्यात आली . त्याचप्रमाणे आज राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त महापालिका मुख्यालयात महापौर ॲड हर्षाली चौधरी यांनी भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासमयी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी, महापालिका सचिव किशोर शेळके, सुरक्षा अधिकारी भारत बूळे, वरिष्ठ लिपीक प्रवीणा कांबळे, सहा. माहिती व जनसंपर्क अधिकारी सुमित बोयत, तसेच इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता ।
