- महावितरणचा मुरबाड, शहापूर मधील वीज चोरांना दणका,१३ लाखांची वीज चोरी पकडली ।
कल्याण : महावितरणच्या कल्याण मंडळ–२ च्या वतीने मागील दोन दिवस शहापूर आणि मुरबाड परिसरात राबवलेल्या विशेष मोहिमेत ८२ वीज चोरीची प्रकरण उघडकीस आली असून याचे मुल्यांकन १३ लाख रुपये आखण्यात आले आहे.महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कल्याण -२ मंडळ कार्यालय कडून शहापूर आणि मुरबाड परिसरात वीज चोरीच्या घटना वाढत असल्याची माहिती गुप्त माहिती मिळाली होती. याची खात्री करण्यासाठी विशेष पथक तयार केले होते. या मोहिमेत १९ अभियंते, १८ लेखा कर्मचारी व ४५ जनमित्र यांनी सहभाग घेतला.या मोहिमेदरम्यान विविध ठिकाणी ८०० पेक्षा अधिक वीजजोडण्यांची सखोल तपासणी करण्यात आली. तसेच अनधिकृत वीजवापर व वीजचोरीच्या प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात आली.तपासणीदरम्यान ८२ वीजचोरीची प्रकरणे निदर्शनास आली. या प्रकरणांमध्ये एकूण ७२,४३८ युनिट वीजचोरी झाल्याचे आढळून आले असून, त्याची अंदाजे ₹ १३,११,८०० इतकी रक्कम जवळपास निश्चित करण्यात आली आहे.आढळून आलेल्या सर्व प्रकरणांमध्ये संबंधित ग्राहकांविरुद्ध वीज अधिनियम, २००३ मधील तरतुदीनुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच थकीत दंड व वीजबिलाची रक्कम विहित मुदतीत न भरल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.अशी माहिती उपमुख्य जनसंपर्क अधिकारी कोकण प्रादेशिक कार्यालय, कल्याण यांनी दिली आहे।
