- ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ आयोजित करण्यात आले।
डोंबिवली : राज्यभरात सुरू असलेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ अभियानांतर्गत डोंबिवली पूर्व येथे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व तहसीलदार कार्यालय कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी सुलभ आणि जलद पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत.शिबिरात विविध दाखले उपलब्ध करून देण्याबरोबरच नागरिकांच्या अडचणींचे तत्परतेने निराकरण करण्यासाठी मार्गदर्शनही देण्यात आले. यावेळी श्रावण बाळ योजना व संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, नगरसेवक मंदार हळबे, नगरसेविका रंजनाताई पेणकर, डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्षा प्रियाताई जोशी यांच्यासह महसूल अधिकारी, नागरिक व इतर मान्यवर उपस्थित होते ।
