मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर ।

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सपत्नीक विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा महासागर ।
  • राज्यात सुख-समृद्धी नांदो, शेतकरी सुखी-समृद्ध होवो आणि जनतेच्या जीवनात आनंद आणि समाधान लाभो; मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना ।

पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पांडुरंगाची सपत्नीक शासकीय महापूजा केली आहे. आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी यंदा धाराशिव जिल्ह्याला मानाचा बहुमान मिळाला आहे. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील गौरगावचे रहिवासी असणारे माने दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले आहे.विठ्ठल मंदिरात आलं की उर्जा मिळते. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडु दे, महाराष्ट्राच्या अन्नदात्या बळीराजाच्या सुख, समृद्धी आणि संकटमुक्त जीवनासाठी विठ्ठल चरणी साकडे घातले. तरुणाईला दिशा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींजींना आर्शीवाद द्यावा. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. तर पहाटेपासूनच पंढरपुरात वारकऱ्यांच्या भक्तीचा अलोट महासागर सध्या अनुभवायला मिळाला आहे. तर भक्तांची 20-25 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्याचे चित्र आहे. एकूणच चंद्रभागेच्या तिरावर भक्तांचा महापूर देखील विठ्ठलनगरीत अनुभवायला मिळतो आहे. दरम्यान, विठ्ठलाची महापूजा संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील रहिवासी असणारे आणि यंदाचे मानाचे वारकरी असलेले माने दाम्पत्यासह रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेले. इथं रुक्मिणी मातेला दुग्धाभिषेक घालून मुख्यमंत्री फडणवीस आणि माने दाम्पत्यांनी पूजा केली. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. विठ्ठल मंदिरात आलं की उर्जा मिळते. राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडु दे, हेच विठुरायाकंडे साकडे घातले. तरुणाईला दिशा देण्यासाठी पंतप्रधान मोदींना आर्शीवाद द्यावा. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पंढरपुरातील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पादुका मंदिराच्या नव्या भक्त निवासाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे उपस्थित होते. विठ्ठलाची शासकीय पूजा झाल्यानंतर आळंदी देवस्थानच्या वतीने पंढरपुरात नवीन भक्तनिवास उभं केले जात आहे. याचच भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यामुळे आता पंढरपुरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका मंदिरा सोबतच नवे भक्तनिवास लवकरच उभारले जाणार आहे. या आषाढी एकादशीनंतर जुने पंढरपूर इतिहास जमा होणार असून मंदिर परिसरात विशाल असा कॉरिडॉर उभा करण्याचे काम सुरू होणार आहे. यामुळे शेकडो वर्षांचे वाडे आणि जुन्या इमारती इतिहास जमा होणार आहेत. यंदाची आषाढी ही आमच्या पिढ्यान पिढ्यांसाठी कायम स्मरणात राहील, हे कटू आठवण म्हणून आम्ही ती जतन करू. अशा पद्धतीचे निराशाजनक उद्गार मंदिर परिसरातील बाधित नागरिकांकडून काढण्यात येत आहेत. मात्र, या कॉरिडॉरनंतर भविष्यात पुढील पन्नास वर्षाचा भाविकांचा विचार करून ही विकास कामे सुरू केली आहे, असेही ते म्हणाले ।