छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे जोरदार रास्ता रोको आंदोलन ।

  • छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसचे जोरदार रास्ता रोको आंदोलन ।

कल्याण : कल्याण शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे जंतर-मंतर दिल्ली येथे दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणी /अमानुष अत्याचार च्या विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपविरोधी घोषणाबाजी केली । कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत नवीन सिंग यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, श्रीमती प्रियंका गांधी वाड्रा, काँग्रेसचे खासदार, नेते, व जंतर मंतर दिल्ली येथिल व देशातिल विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईची चौकशी करून योग्य कार्यवाही करणयासाठी भारताच्या मा. राष्ट्रपती महोदया यांनी कारवाई करावी असे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले ।

प्रमुख मागण्या :

1. केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्काळ राजीनामा घ्यावे.

2. परीक्षा प्रक्रियेमधील अनियमितता व विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर संसदेत तातडीने चर्चा करण्याचे आदेश द्यावे.

3. विद्यार्थी व शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांविरुद्ध नोंदविण्यात आलेले सर्व गुन्हे व एफआयआर तात्काळ मागे घेण्यात यावेत.

4. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील सर्व विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागावी.⁠

या कार्यक्रमात नगरसेविका समीना शेख, मा. नगरसेवक इफ्तेख़ार खान, कट्टी मनी, सलीम शेख, सुभाष सिंग, अजित सिंह, सौ वैशाली वाघ, सौ रिना खांडेकर, एडवोकेट अपेक्षा दळवी, अमोल गायकवाड, रोहन नायडू, मिलिंद परदेशी, राजा कला शेट्टी, रणजित डांगले ,पन्नालाल शर्मा, आझम शेख, चेतन भंडारी, विमलेश शर्मा, इमरान खान बाबा, शैलेश खंडेलवाल, राजू गवळी,राजेश दीक्षित, प्रमोद बालन, हाफिज कुरेशी, फिरोज शेख, तसेच कॉंग्रेस पदाधिकारी उपस्थित होते ।