कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर पथ विक्रेता समिती निवडणूक २०२६ येत्या १८ तारखेला एकूण दहा प्रभागात निवडणूक अधिकाऱ्याच्य देखरेखीखाली पार पडणार ।

  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर पथ विक्रेता समिती निवडणूक २०२६ येत्या १८ तारखेला एकूण दहा प्रभागात निवडणूक अधिकाऱ्याच्य देखरेखीखाली पार पडणार ।

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील फेरीवाला प्रश्न व त्यांचे पूर्णवसन याकडे प्रशासनाने ‘होईल’ असे आश्वासन जरी दिले असले तरी वास्तविकतेत फेरीवाल्यांवर कारवाई एवढ्यावरच पालिकेने ढोल बडवले आहेत. आता पूर्णवसन प्रश्नावर निवडणूक हा पर्याय समोर ठेला असून निवडून प्रक्रिया पार पडणार आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका शहर पथ विक्रेता समिती निवडणूक २०२६ येत्या १८ तारखेलाएकूणदहा प्रभागात निवडणूक अधिकाऱ्याच्य देखरेखीखाली पार पडणार आहे. या निवडणूकित ९५३१ नोंदणीकृत फेरीवाले निवडणूकिचा हक्क बजावणार आहेत. विशेष म्हणजे हि पालिकेतील पहिली निवडणूक बॅलेट पेपरवर होणार आहे. पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन अधिनियम २०१४ आणि २०१८ मधील नियमांनुसार ही निवडणूक घेतली जात आहे. पॅनल व धडाकेबाज पथविक्रेता पॅनल अशी दोन पॅनल निवडणुकीत समोरा समोर उभे आहेत. या निवडणुकीत एकूण आठ जागांकरता होणार आहे. या निवडणुकीत राखीव प्रवर्गातील बिनविरोध उमेदवार रेखा अशोक सोनवणे (अनुसूचित जाती (महिला), आरती अशोक पोटावे अनुसूचित जमाती), प्रशांत शांताराम माळी (इतर मागास प्रवर्ग), आशा किशोर मगरे (अल्पसंख्याक (माहिला) आणि रघुनाथ बाळू भोईर (विकलांग – दिव्यांग) बिनविरोध निवडणून आले. आणखी तीन जागांकरता हि निवडणूक होणार आहे. यात भीमशक्ती शिवशक्ती कष्टकरी होकर्स पॅनल व धडाकेबाज पथविक्रेता पॅनलमधून भालचंद्र (भाऊ) पाटील, नाना पाटील, महिला आरक्षणातून दर्शना गायकवाड तर धडाकेबाज पथविक्रेता पॅनल मधून अभयलाल दुबे, राजू गुप्ता आणि महिला आरक्षणातून देवकानंद नंदू जाधव हे उमेदवार आहेत. या निवडणुकीत जास्तीत जास्त नोंदणीकृत फेरीवाल्यांनी मतदान करावे असे आवाहन दोन्ही पॅनल मधून करण्यात आले आहे ।